जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगली मधील बुधगाव गावात व्यंकटराव अण्णा पाटील सांस्कृतिक मंडळ सिद्धेश्वर चौक यांचे वतीने,जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदात,विठ्ठल मंदिर गावभाग बुधगाव येथे संपन्न झाला.आजच्या जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून सौ प्रणिता पवार जिल्हा अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड सांगली व अध्यक्षस्थानी एडवोकेट आरती सातविलकर जिल्हा सरकारी वकील,सौ कल्पना दिलीप पाटील व सौ वैशाली विक्रम पाटील या होत्या.
सौ प्रणिती रामचंद्र पवार या जिजाभाऊ ब्रिगेड सांगली जिल्हा अध्यक्ष शिवसेना म्हणून कार्यरत असून,त्यांनी आजपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ,प्लास्टिक मुक्त चळवळ,विविध ठिकाणी कौटुंबिक सोहाळे,वाढदिवस या मध्ये हिरारीने भाग घेऊन,मी जिजाऊ बोलते या एकपात्री नाटकाच्या प्रयोगाचे अत्यंत उत्कृष्ट सादरीकरण केले आहे.त्याचबरोबर सौ.आरती आनंद देशपांडे- सातविलकर या बीएससी एलएलबी असून, सन 2000 ला शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर येथून कायद्याची पदवी संपादन केली व 2004 पासून वकिली व्यवसायात सुरुवात करून,2015 साली दिवाणी ग्राहक न्यायालयात काम पाहिले आहे.सन 2015 साली सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती होऊन त्यांनी बऱ्याच सर्व घटनेतील केसेस हाताळल्या असून,आत्तापर्यंत जवळपास त्यांच्या 70 केसेस मध्ये आरोपींना शिक्षा शाबित झाल्या आहेत.त्यानंतर त्यांनी कौटुंबिक न्यायालयाचे काम देखील पाहिले आहे.आजच्या झालेल्या कार्यक्रमात एडवोकेट रोहिणी मोरे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल,त्यांचा आज सत्कार करण्यात आला.
आजच्या झालेल्या जागर स्त्रीशक्तीच्या कार्यक्रमात एडवोकेट सौ कविता चव्हाण मॅडम,एडवोकेट सौ.आरती आनंद सातविलकर, एडवोकेट आसावरी पाटील,एडवोकेट रोहिणी मोरे,बुधगाव गावच्या सरपंच वैशाली विक्रम पाटील व ग्रामपंचायत महिला सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.आजच्या जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात महिला वर्गांचा मोठ्या सहभाग दिसला असून,अतिशय उत्साहात व आनंदात कार्यक्रम संपन्न झाला.
आजच्या झालेल्या जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात सौ. वैशाली विक्रम पाटील सरपंच बुधगाव या अध्यक्षस्थानी होत्या.तसेच बुधगाव ग्रामपंचायत मधील सर्व महिला सदस्य,बुधगाव शहरातील महिलावर्ग व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.आजच्या व्यंकटराव अण्णा पाटील सांस्कृतिक मंडळ सिद्धेश्वर चौक बुधगाव यांचे वतीने झालेल्या जागर स्त्री शक्तीचा हा कार्यक्रम,फार मोठ्या प्रमाणात संपन्न झाला असून,महिला वर्गात अतिशय उत्साहाचे व आनंदाचे वातावरण बघावयास मिळाले यंदाच्या वर्षीच्या नवरात्रीच्या उत्साहात हा कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणात झाल्याने,सर्वत्र या कार्य माक्रमाचे कौतुक होत असताना दिसत आहे.