जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
रत्नागिरी येथे नवीन उद्योग भवनाचे भूमिपूजन,काल महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले असून, जिल्हास्तरांवर असलेल्या उद्योग मित्र समितीकडून आपल्याला,जिल्ह्याच्या उद्योग वाढीसाठी आवश्यक त्या सूचना पाठवाव्यात,अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे.महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून प्रत्येक वर्षी 5016 उद्योजक उभी करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून,आत्तापर्यंत 13,526 उद्योजक तयार केले आहेत,असे राज्याचे उद्योग मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून,संभावित कर्ज घेणाऱ्या तरुण उद्योजकांना 35% अनुदान देण्यात येणार असल्याचे,राज्याचे उद्योग मंत्री यांनी स्पष्ट केले.रत्नागिरीत काल झालेल्या नूतन उद्योग भवनाच्या भूमिपूजनाचा समारंभ राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडल्यामुळे, लवकरच रत्नागिरीतील नवीन होणाऱ्या उद्योग भवनाच्या मुळे, रत्नागिरीतील उद्योग विकासाला एक प्रकारे चालना मिळेल अशी आशा रत्नागिरीतील नवोदित तरुण उद्योजकांकडून व्यक्त होत आहे.