नव्याने मान्यता दिलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन करावे.-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ.!

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अजित निंबाळकर)

मुंबई,दि.१७: राज्यात नव्याने मान्यता दिलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ज्याठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत अशा  ठिकाणी येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन करावे अशा सूचना वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.नव्याने मान्यता दिलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या विविध कामांचा मंत्रालयात आढाव घेतांना ते बोलत होते.

यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे,आयुक्त राजीव निवतकर,वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर यांच्यासह नवीन मान्यता मिळालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता दूरदृश्य संवाद प्रणालीव्दारे उपस्थित होते.

मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले,राज्यात नव्याने मान्यता दिलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी भुखंड सर्व ठिकाणी उपलब्ध झाले असून बांधकाम प्रक्रिया सुरू करण्याच्या संबंधितांना सूचना देण्यात आले आहेत.तसेच ज्या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत.अशा ठिकाणी वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया तयारी करण्यात यावी.याबरोबरच पद निर्मिती,पदभरती, लेखाशीर्षसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले असल्याचे श्री मुश्रीफ यांनी सांगितले.

 येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरु होणा-या प्रवेशाबाबत नियोजन,जिल्हा रुग्णालयाचे नुतनीकरण,यंत्रसामुग्री, उपकरणे,फर्निचर,ग्रंथालय व इ.बाबींसह अधिष्ठाता यांच्या अडचणींचा आढावा यावेळी घेण्यात आला असल्याचे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top