जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
देशातील बाजारपेठे कांद्याची मुबलक उपलब्धता व्हावी यासाठी देशातील केंद्र सरकारने,कांद्याच्या निर्यात मूल्यात प्रति मेट्रिक टन 800 अमेरिकन डॉलर ने वाढ करण्याचे निश्चित केले आहे.देशातील आता कांदा प्रति किलोमागे 67 रुपये असा दर येत असून,दरम्यान 31 डिसेंबर 2023 पर्यंत हे दर लागू राहतील,असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.देशातील केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने आणखी एक विशेष निर्णय घेतला असून,त्यानुसार जवळपास आणखी 2 लाख टन कांदा खरेदीची घोषणा केली आहे.
देशातील केंद्र सरकारच्या केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार,5 लाख टन कांद्याची खरेदी केंद्र सरकार करणार असून,जवळपास आणखी भर घालत, त्यात जवळपास जादा 2 लाख टन कांदा खरेदीची घोषणा केंद्र सरकारने केली आहे.देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा एक फार मोठा दिलासा म्हणावा लागेल.शिवाय देशातील कांदा खरेदी ग्राहकांना देखील यामुळे कांदा खरेदी करण्यास सुलभता येणार आहे.