शाही दसरा कोल्हापूरचा" या महोत्सवात "करून गेलो गाव" कार्यक्रमाला प्रेक्षकांची गर्दी.!

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अजित निंबाळकर)

कोल्हापूर, दि.१८ : कोल्हापूर पूर्वीपासूनच कलापूर म्हणून ओळखले जाते.या अनुषंगाने यावेळी 'शाही दसरा कोल्हापूरचा' या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन दसरा चौकातील रंगमंचावर करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी करून गेलो गाव या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कलानगरी कोल्हापूरातील श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.दसरा चौकात तुफान गर्दीत कार्यक्रम सादर झाला.भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांच्या अभियनातून साकारलेले हे विनोदी नाटक कोल्हापूरकरांनी पाहिले.

‘करुन गेलो गाव’ कोल्हापूरच्या रंगभूमीवर दमदारपणे सादर होत असताना या नाटकात सुरुवातीपासून ते अगदी शेवटची काही मिनिटे शिल्लक असेपर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन झाले. कोकणातले गाव तिथले अण्णा सरपंच भाऊ कदम त्यांची बायको,गंपू मास्तर,गावातली इरसाल मंडळी ही पात्र श्रोत्यांना हसवून सोडतात.त्यात अपक्ष आमदार पुन्हा निवडून येण्याचं स्वप्न पाहतो.मुख्यमंत्री प्रथमच गावात येणार तेव्हा त्यांच्या मनोरंजनासाठी गावातल्या लोकांचा पारंपारिक कार्यक्रम न ठेवता नटरंगी नाच कार्यक्रम ठेवतात.हे पाहण्या ऐकण्यासाठी नाटक प्रत्यक्ष पाहण्यात खरी मजा आहे.आणि अशा या नाटकाचा मजा कोल्हापूरकरांनी अनुभवली.नाटकाच्या मध्यांतरात शाही दसरा संयोजन समितीच्यावतीने,सर्व कलाकारांचा सन्मान व स्वागत करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top