जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगलीत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने,शहरातील विविध समस्यांच्या बाबतीत,विशेषतः प्रभाग क्रमांक 14 व प्रभाग क्रमांक 9 या भागातील नागरिकांच्या समस्या बाबतीत, सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेचे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे. सांगली शहरातील प्रभाग क्रमांक 14 व प्रभाग क्रमांक 9 भागातील नागरिकांना,रस्त्यावरून जाताना जीवघेणी कसरत करावी लागत आहे,शिवाय आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येऊन अस्वच्छता निर्माण झाली आहे.आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सांगली शहरातील आरोग्याच्या समस्या बाबतीत,काही शहरातील भागामधून रस्त्यावर असणाऱ्या अंधारातून म्हणजे विशेषतः सध्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये (नवीन उड्डाणपूल सह्याद्री नगर ते मिरज दरम्यान) नागरिकांना प्रवास करावा लागत आहे.रात्रीच्या वेळेला पथदिवे नसल्याने शहराला विशेषतः काही प्रभागांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले असून,शहराच्या काही भागांमध्ये भकास स्वरूप प्राप्त झाले आहे.यासंदर्भात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने, सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेत निवेदन देण्यात आले असून,प्रशासनाच्या वतीने सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेचे उपायुक्त श्रीयुत रोकडे यांनी निवेदन स्वीकारले असून झालेल्या बैठकीत पुढील कारवाई करणेबाबत आश्वासन दिले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज देण्यात आलेल्या निवेदना वेळी शहराध्यक्ष दयानंद मलपे,शहर उपाध्यक्ष सागर कोळेकर,विभाग अध्यक्ष राहुल बापट,संजय खामकर, अभिषेक गवळी,विशाल पवार,अभिजीत नाटेकर,इत्यादी पदाधिकारी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.