जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
चिंतामणराव व्यापार महाविद्यालय,सांगली येथील अर्थशास्त्र विभागामार्फत दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ रोजी महाविद्यालयात भित्ती पत्रक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध विषयावर भित्ती पत्रके तयार करून त्यांचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी डॉ.सौ.व्ही.एस.दांडेकर,माजी उपप्राचार्या,चिंतामणराव व्यापार महाविद्यालय,सांगली या होत्या.स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.व्ही.वाघमारे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.अजय व्ही.माने,अर्थशास्त्र विभाग हे होते .मुख्य अतिथी डॉ.सौ.व्ही.एस.दांडेकर मॅडम आणि प्रा. एन.के.आपटे यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.
उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी मुख्य अतिथी डॉ.सौ. व्ही.एस.दांडेकर यांनी विद्यार्थ्याना विषयानुरूप भित्ती पत्रक कसे तयार करावे त्याच बरोबर विषयातील बारकावे कशा पद्धतीने सादर करावे या विषयी मार्गदर्शन केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.व्ही.वाघमारे यांनी कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल सर्वांचे कौतुक केले.
या स्पर्धांमध्ये बी कॉम,बी बी ए आणि एम कॉम या कोर्सेस मधील विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला.प्रा.डॉ.निवृत्ती कोटकर यांनी आभार प्रदर्शन केले.या कार्यक्रमासाठी प्रा. एन.के.आपटे,प्रा.विजय साळुंके,प्रा.लीना काक्रंबे,प्रा.विनायक पाटील,प्रा.सी.ए.श्रावणी देशपांडे इत्यादी चे सहकार्य मिळाले.