-1100 बेडेड हॉस्पिटलचेही होणार यावेळी भूमीपूजन.
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
कोल्हापुरातील शेंडा पार्क येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील ऑडिटोरियम, लायब्ररी, लेडीज हॉस्टेल, शवविच्छेदनगृह या इमारतींचे बांधकाम पूर्ण होत आले असून या इमारतींचे लोकार्पण व 1100 बेडेड हॉस्पिटलचे भूमीपूजन येत्या डिसेंबर मध्ये होणार असल्याची माहिती देवून सीपीआरला आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन देवून सीपीआर हॉस्पिटल अधिक सक्षम बनवणार असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
श्री.मुश्रीफ यांच्या सुचनेनुसार राजर्षी छपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, येथे अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागात पहिली हिप ट्रॉन्सप्लांट शस्त्रक्रिया झाली आहे. या विभागाला आज पालकमंत्री श्री.मुश्रीफ यांनी भेट दिली.सीपीआर येथील अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागात खुब्याचे हाड मोडल्यामुळे उपचाराकरीता भूदरगड तालुक्यातील वाघापूर येथील श्रीमती पार्वती कुंभार (वय ७० वर्षे) येथील महिला दाखल करण्यात आल्या होत्या.यांच्या खुब्याचे प्रत्यारोपन ( THR) करणे गरजेचे होते परंतु वय लक्षात घेता शस्त्रक्रिया जोखमीची होती. त्यानुसार त्यांना भुलेसाठी लागणाऱ्या सर्व चाचण्या करुन अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागाचे प्राध्यापक व प्रमुख डॉ.राहूल बडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.गिरीप मोटे व सहकारी यांनी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली असल्याची माहिती पालकमंत्री श्री.मुश्रीफ यांनी दिली.शेंडा पार्कमध्ये होणाऱ्या 1100 बेडच्या हॉस्पिटल मधील 600 बेड सामान्य, 250 बेड कॅन्सर साठी तर 250 बेड सुपर स्पेशलिटी साठी असतील,अशीही माहिती श्री.मुश्रीफ यांनी दिली.
या हिप ट्रॉन्सप्लांट शस्त्रक्रियेवेळी अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव आणि वैद्यकीय अधिक्षक डॉ.शिशीर मिरगुंडे यांनी शस्त्रक्रियागृहात उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन केले. शस्त्रकियेसाठी प्राध्यापक व विभागप्रमुख भूलशास्त्र विभाग डॉ.आरती घोरपडे व सहारी यांनी यशस्वीरीत्या भूल दिली.मोडयुलर ऑपरेशन थिएटर मधील स्टाफ इन्चार्ज शितल शेटे व इतर सहकारी यांनी यावेळी सहकार्य केले. सध्यस्थितीत रुग्णाची प्रकृती स्थिर असून रुग्णाला पूर्वीप्रमाणे चालता येत आहे. रुग्णाची अर्थिक परिस्थिती अत्यंत गरीबीची असल्यामुळे शस्त्रक्रियेकरीता वरद बिल्डर अॅन्ड डेव्हलपर्स, कोल्हापूरचे श्री संजय चव्हाण यांनी रुपये ४५ हजार इतकी अर्थिक मदत देऊन अत्यंत मोलाचे सहकार्य केले. यासाठी देणगी समिती समन्वयक श्री.महेंद्र चव्हाण, समाजसेवा अधिक्षक विभागप्रमुख श्री. शशिकांत राऊळ व श्री अजित भास्कर यांनी प्रयत्न केले. पालकमंत्री श्री.मुश्रीफ यांच्या सुचनेनुसार छपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात लवकरच गुडघे प्रत्यारोपन (TKR) शस्त्रक्रियेची सुविधा चालू होणार आहे,अशी माहिती डॉ.राहूल बडे यांनी यावेळी दिली.