जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(सोशल मीडिया मार्फत)
(अनिल जोशी)
दक्षिण इस्राईलच्या अनेक क्षेत्रावर,हमास या दहशतवादी संघटनेने आज सकाळी हल्ला चढवला असून,इस्राईलने देखिल प्रत्तुतरादाखल हमास या दहशतवादी संघटनेच्या गाझापट्टीच्या क्षेत्रावर,बॉम्ब वर्षाव केला आहे.
दरम्यान हमास या दहशतवादी संघटनेने हल्ला केल्यानंतर इस्राईलचे 100 नागरिक ठार झाले असून, 300 जण जखमी झाले आहेत. प्रत्युत्तर दाखल केलेल्या इस्राईलने हवाई बॉम्ब हल्ल्यात, 198 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला असून,1610 नागरिक जखमी झाले आहेत. दरम्यान आंतरराष्ट्रीय समुदायाने देखील इस्रायल वर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून, भारताने देखील आम्ही इस्राईलच्या पाठीशी उभे आहोत असे म्हटल्याचे वृत्त आहे.
आज सकाळी हमास या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी, इस्राईलमध्ये समुद्रमार्गे घुसले आणि बेछूट गोळीबाराला सुरुवात केली.त्यामुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण होऊन लोकांच्यामध्ये पळापळ व आक्रोश पहावयास मिळाला असल्याचे वृत्त आहे.त्याचबरोबर जिकडे तिकडे सायरन वाजू लागल्याने,पोलीस व सुरक्षा दले ही सज्ज झाली. दरम्यान गाझापट्टीवर हमास दहशतवादी संघटनेचे प्राबल्य असून, इस्राईलने गाझा पट्टीवर केलेल्या प्रत्युत्तर दाखल हल्ल्यात, 198 नागरिक ठार झाले असून, 1610 नागरिक जखमी झाले आहेत. संपूर्ण गाझापट्टीवर इस्राईलच्या विमानांनी बॉम्ब वर्षाव करत,धूळधाण उडवून दिली.
दरम्यान भारत सरकारने पॅलेस्टिन व इस्राईल मधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर,त्या भागात राहत असणाऱ्या सर्व नागरिकांना,सुरक्षेसंबंधी सावधानतेचा इशारा दिला असून, सुरक्षित स्थळी थांबण्याचे आवाहन केले आहे.इस्राईल मध्ये असलेल्या भारतीय अधिकाऱ्यांना देखील,केंद्र सरकारने योग्य त्या सूचना व नियमाचे पालन करण्यासंबंधी आदेश दिले आहेत.जागतिक स्थानी अव्वल असलेल्या इस्राईलवर, क्षेपणास्त्रांच्या हल्ल्याद्वारे केलेल्या हमास या दहशतवादी संघटनेच्या कारवाईमुळे,जागतिकस्तरावर पडसाद उमटले असून,यापुढे या युद्धाचे परिणाम जागतिक स्तरावर कशा पद्धतीने उमटतात? हे पाहणे विशेषतः योग्य ठरेल असे वाटते.