जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र आणि गोव्याच्या दौऱ्यावर असणारा असून,निळवंडे धरणाचे जलपूजन तसेच लोकार्पण,त्याबरोबरच 7500 हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पाची पायाभरणी समारंभ,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.अहमदनगर इथल्या महिला बाल रुग्णालयाचे भूमिपूजन,नवीन शिर्डी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन तसेच शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाचा समारंभ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या महाराष्ट्र राज्यातील नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा शुभारंभ करणार असून, जवळपास राज्यातील 86 लाख हून अधिक शेतकरी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.राज्यातील शिर्डी साईबाबा समाधी मंदिराला,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भेट देणार असून,शिर्डी मंदिरातील नवीन बांधण्यात आलेल्या दर्शन रांग संकुलाचे उद्घाटनही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.त्यानंतर गोव्यातील मडगाव येथे पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम वर 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा उद्घाटन,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. एकंदरीत महाराष्ट्र व गुजरात दौऱ्यावर उद्यापासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून,विविध शासनाच्या योजनांचे शुभारंभ होणार आहेत.