देशातील शेतकऱ्यांना कृषी निर्यातीमध्ये,जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन.-- केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शहा.!

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

देशातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या उत्पादनाची निर्यात करून,जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे,केंद्रीय सहकार मंत्री व गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.केंद्र सरकारने राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेड हे स्थापन करण्याचे एक उचललेलं पाऊल असल्याचे म्हटले असून,ते आज नवी दिल्लीतील सहकारी निर्यात या विषयावरच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन करताना बोलत होते. 

देशातील शेतकऱ्यांच्या उत्पादनाची जास्तीत जास्त निर्यात वाढून,शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा करून देण्यासाठी, केंद्र सरकार प्रयत्न करणार असून,सन 2027 पर्यंत देशातील जवळपास 2 कोटीहून अधिक शेतकरी,सेंद्रिय शेती उत्पादनाच्या बाबतीत आघाडीवर असतील.आज नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील सहकारी निर्यात या चर्चासत्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते.यावेळी त्यांनी राष्ट्रीय सहकार निर्यात लिमिटेड च्या बोधचिन्हाचे, संकेतस्थळाचे,माहिती पुस्तकाचे प्रकाशन करून,देशातील सहकार क्षेत्राला मजबुती करण्याचे कार्य केंद्र सरकार करणार असून,हे एक केंद्र सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top