जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
थायलंड सरकारकडून पर्यटन क्षेत्राला अधिक चालना व मजबुती देण्यासाठी,विजा प्रक्रिया 10 नोव्हेंबर 2023 पासून 10 मे 2024 पर्यंत भारतीय नागरिकांसाठी रद्द केली आहे.आता सर्व भारतीय नागरिकांना विजाशिवाय थायलंडमध्ये प्रवास करणे सोयीस्कर होणार असून,थायलंडच्या प्रधानमंत्री स्नेथा थाविसिन यांनी काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर,पत्रकार परिषदेत निर्णय जाहीर केला.
मध्यंतरी थायलंड सरकारने पर्यटन क्षेत्राला व उद्योगाला अधिक मजबुती देण्यासाठी सप्टेंबर मध्ये,चिनी पर्यटकांसाठी विजा रद्द केला होता.आज थायलंड सरकारने भारतीयांसाठी ही एक खुशखबर दिली असून,आपल्या देशात पर्यटन क्षेत्राचे अधिक मजबुतीकरण करण्यासाठी व उद्योगाला चालना देण्यासाठी,विजा प्रक्रिया रद्द करून,थायलंडच्या प्रधानमंत्री स्नेथा थाविसीन यांनी एक हा मोठा धाडसी निर्णय घेतला आहे.भारतीय नागरिकांसाठी एक विशेष आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल.