जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
लक्षद्वीप मध्ये शिवसंघ प्रतिष्ठान तर्फे येत्या 26 नोव्हेंबर 2023 पासून आंतरराष्ट्रीय जहाजावर,10वे विश्व मराठी संमेलन भरणार आहे.लक्षद्वीप मध्ये होणारे शिवसंघ प्रतिष्ठान तर्फे 10 वे आंतरराष्ट्रीय विश्व मराठी संमेलन हे जहाजावर भरणार असून, हे पहिलंच तरंगते साहित्य संमेलन असणार आहे. शिवसंघ प्रतिष्ठान तर्फे आयोजित केलेल्या 10व्या विश्व मराठी संमेलनाचे अध्यक्षपद नौदलाचे निवृत्त अधिकारी व शौर्य चक्र पदकांना सन्मानित असलेले कमांडोर जय चिटणीस भूषवणार आहेत.
लक्षद्वीप मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय 10 व्या विश्व मराठी संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निलेश गायकवाड असणार असून,सदरहू संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे.शिवसंघ प्रतिष्ठान तर्फे होणारे 10वे मराठी विश्व संमेलन,येत्या 26 नोव्हेंबर 2023 पासून जहाजावर होणार असल्याने,हे पहिलेच तरंगते साहित्य संमेलन असणार असून,या संमेलनास अनेक सन्माननीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत.एकंदरीतच आंतरराष्ट्रीय जहाजावर होणारे तरंगते संमेलन,हा एक आगळावेगळा कार्यक्रम साहित्य संमेलनाचा असणार आहे.