जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यात,राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून, दिवाळीच्या हंगामात 10% हंगामी भाडेवाढ केली असून, यामुळे सर्व प्रकारच्या बस तिकिटांच्या भाड्यामध्ये 10% भाडेवाढ हि,ऐन दिवाळीत हंगामात,बस प्रवाशांच्यावर होणार आहे.महाराष्ट्र राज्यातील राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून मिळालेल्या सूत्रानुसार ही 10% हंगामी भाडेवाढ,दि. 8 नोव्हेंबर 2023 पासून दि. 27 नोव्हेंबर 2023 पर्यंत लागू राहणार आहे.28 नोव्हेंबर 2023 पासून मात्र परत मूळ तिकीट दराप्रमाणे आकारणी सुरू होईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यात,एसटी बसचे दिवाळी हंगामात आरक्षण केलेल्या बस प्रवाशांना देखील,वरील नमूद केलेल्या कालावधी उर्वरित 10% फरकाची रक्कम,प्रत्यक्ष प्रवास करताना,एसटी बस वाहकांकडे भरावी लागणार आहे.महाराष्ट्र राज्यात राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून झालेल्या 10% भाडेवाडी मुळे, सामान्य एसटी बस प्रवाशांचे मात्र कंबरडे मोडणार आहे. एकंदरीतच राज्यातील ऐन दिवाळी हंगामात राज्यमार्ग परिवहन मंडळाकडून करण्यात आलेल्या 10% भाडेवाढीमुळे, बस प्रवाशांमध्ये काहीशी नाराजी असल्याचे दिसून येत आहे.