जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
येत्या डिसेंबर व जानेवारी मध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन घेतलेल्या निर्णयानुसार,बँक कर्मचाऱ्यांचा संप होणार असून,जवळपास 13 दिवस बँका बंद राहणार असल्याचे दिसत आहे.बँक कर्मचारी आपल्या नवीन पदभरती,आऊटसोर्सिंग बंद करून कायमस्वरूपी कर्मचारी ठेवा या मागणीच्यासाठी संपावर जाणार आहेत.ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार,बँक कर्मचारी डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 या दरम्यान 13 दिवस संपावर जाणार आहेत.
ऑल इंडिया बँक एम्पलॉइज असोसिएशन च्या अधिसूचनेनुसार,4 डिसेंबर 2023 पासून 20 जानेवारी 2024 पर्यंतच्या ठराविक कालावधीत,बँक कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी देशभरात संप करणार असून,सुरुवातीच्या पहिल्या टप्प्या 4 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2023 या कालावधीत ठराविक बँकांचे कर्मचारी,देशभरात संपावर जातील,शिवाय 2 जानेवारी ते 6 जानेवारी 2024 पर्यंतच्या कालावधीत,ठराविक एके दिवशी,सर्व बँकांचे कर्मचारी संपावर जातील.मात्र देशभरात 19 आणि 20 जानेवारी 2024 रोजी सर्व बँकांचे सर्व कर्मचारी संपावर जाणार आहेत.