जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगलीत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे, महाराष्ट्राच्या तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्यात,सांगलीत तरुण भारत स्टेडियम वर प्रचंड मोठी सभा घेणार असून,ते मराठा समाजास आरक्षण प्रश्नावर,पुढील आंदोलनाच्या दिशेसंबंधी मार्गदर्शन व संबोधन करणार आहेत.मराठा आरक्षण प्रश्नावर सरकारला 24 डिसेंबर 2023 पर्यंत मुदत दिल्यावर आता मनोज जरांगे हे तिसऱ्या टप्प्यातील दौरा करण्यासाठी 17 नोव्हेंबर रोजी सांगली जिल्ह्यात येणार आहेत.सांगली जिल्ह्यात मायणी मार्गी प्रवेश करत ते सकाळी 8:30 वाजता विटा येथे पहिली सभा घेतील.
या सभेनंतर नियोजीत वेळेनुसार त्यांचे सकाळी 11 वाजता सांगली शहरात आगमन होईल.सांगली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करून ते तरुण भारत स्टेडीयम येथील सभास्थळी दाखल होतील.मराठा आरक्षण लढ्यावर उपस्थित जनसमुदायाला अभिवादन करून ते जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन कोल्हापूरकडे रवाना होतील.संध्याकाळच्या सत्रात इस्लामपूर येथे आगमन व जनसमुदायला पुढील आंदोलन संदर्भात मार्गदर्शन करून कराड कडे रवाना होतील.सांगली जिल्ह्यातील होणारी ही पहिली सभा असल्याने व सांगली जिल्ह्यातील मोर्चातील मुख्य मागण्या या सराटी सभेत पुढे आल्याने,सांगली जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने समुदाय सभेला उपस्थित राहणार आहे.
मोर्चाचे नियोजनासाठी संजय पाटील,राहूल पाटील,सतिश साखळकर,प्रशांत भोसले,नितीन चव्हाण,अमोल चव्हाण,चेतक खंबाळे,विजय साळुंखे,शंभूराज काटकर,रूपेश मोकाशी,प्रदीप कार्वेकर,सतिश भोसले,अमोल गोटखिंडी,अशोक कोकलेकर,विशाल लिपाने पाटील,अविनाश जाधव, यांच्यासह जिल्ह्यातील तमाम मराठा बांधव करत आहेत.