कोल्हापूर जिल्ह्यातील 21 मंदिरांचे विश्‍वस्त,पुजारी सहभागी होणार !.-- ओझर येथे मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’!

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आहेत.त्यातून मिळणार्‍या ईश्‍वरी चैतन्यामुळेच आधुनिक काळातही समाज मंदिरांकडे आकर्षित होतो.त्यामुळे मंदिरांतील पावित्र्याचे रक्षण करणे,हे हिंदु समाजाचे दायित्व आहे.मंदिरातील देवतातत्त्व टिकवण्यासाठी मंदिरांत विधीवत पूजा-अर्चा करणे,प्राचीन मंदिर-संस्कृतीचे संवर्धन करणे,मंदिरांच्या समस्यांचे निवारण करणे,मंदिरात येणार्‍या भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे,दर्शनरांगांचे सुनियोजन करणे,तसेच मंदिर परंपरांचे रक्षण करणे यांसाठी मंदिरांचे विश्‍वस्त,पुजारी,भक्त आदींचे संघटन आवश्यक आहे.त्यासाठी श्री विघ्नहर गणपति मंदिर देवस्थान, लेण्याद्री गणपती मंदिर देवस्थान,श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान, हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने 2 आणि 3 डिसेंबर 2023 यादिवशी श्री विघ्नहर सभागृह,ओझर,जिल्हा पुणे येथे द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे.या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रातून 550 हून अधिक निमंत्रित मंदिराचे विश्‍वस्त,प्रतिनिधी,पुरोहित,मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते,अभ्यासक आदी सहभागी होणार आहेत.या परिषदेत कोल्हापूर जिल्ह्यातील 21 मंदिरांचे विश्‍वस्त,पुजारी सहभागी होणार आहेत,अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे श्री.किरण दुसे यांनी दिली.

या मंदिरांमध्ये प्रामुख्याने नृसिंहवाडी येथील श्री नृसिंहसरस्वती दत्तदेव संस्थानचे अध्यक्ष श्री.संतोष खोंबारे-पुजारी,श्री भोजनपात्र दत्त मंदिर शिरोळ येथील विश्‍वस्त श्री.चारुदत्त कुलकर्णी,कोल्हापूर शहर येथील एकमुखी दत्त देवस्थानचे सचिव,मठाधिपती गुरुवर्य श्री.संतोष गिरीगोसावी महाराज, राधाकृष्ण मंदिराचे विश्‍वस्त श्री.हसमुखभाई शहा,जोतिबा देवस्थानचे हक्कदार आणि वतनदार पुजारी श्री.रणजित चौगुले,गडहिंग्लज येथील श्री महालक्ष्मी मंदिराचे अध्यक्ष श्री. राजेंद्र तारळे,श्री नृसिंह देवस्थान ट्रस्ट सांगवडे येथील विश्‍वस्त श्री.आप्पासाहेब गुरव,तसेच कात्यायनी मंदिराचे वहिवाटदार पुजारी श्री.रामचंद्र गुरव, श्री अंबाबाई भक्त समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद सावंत, श्री उजळाईवाडी देवस्थानचे विश्‍वस्त श्री.अशोक गुरव हे सहभागी होणार आहेत.

 जळगाव येथे पहिल्या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर महासंघाचे कार्य उत्तरोत्तर वाढत असून केवळ 4 महिन्यांमध्ये ते संपूर्ण राज्यभर पोचले आहे.महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात केवळ 6 महिन्यांत  262 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आणि दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे.या परिषदेला ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ते आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णुशंकर जैन, ‘झी’ 24 तास या वृत्तवाहिनीचे संपादक श्री. नीलेश खरे,यांसह श्री अष्टविनायक मंदिरांचे विश्‍वस्त, महाराष्ट्रातील जोतिर्लिंग देवस्थानांचे विश्‍वस्त, संत पिठांचे प्रतिनिधी,यासह देहूचे संत तुकाराम महाराज मंदिर,पैठणचे नाथ मंदिर,गोंदवले येथील श्रीराम मंदिर,रत्नागिरी येथील गणपतीपुळे मंदिर,श्री एकवीरा देवी मंदिर,अंमळनेर येथील मंगळग्रह मंदिर आदी मंदिरांचे विश्‍वस्त,सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री.चेतन राजहंस,हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री.रमेश शिंदे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.

 या मंदिर परिषदेत मान्यवरांचे मार्गदर्शन,मंदिरांशी निगडीत विविध विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत.यामध्ये ‘मंदिरे सनातन धर्मप्रचाराची केंद्रे बनवणे’,‘मंदिरे सरकारीकरण मुक्त करणे’,‘वक्फ कायद्या’द्वारे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण आणि मंदिरे बळकावणे यांवर उपाय,मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्या परिसरात मद्य-मांस बंदी; दुर्लक्षित मंदिरांचा जीर्णोद्धार आदी विषयांवर चर्चा होणार आहे.ही परिषद केवळ निमंत्रितांसाठी असून,यामध्ये सहभागी होण्यासाठी 7020383264 या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन मंदिर महासंघाने केले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top