जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यातील ऊस कारखानदारांनी ऊस उत्पादकांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर,26 तारखेपासून राष्ट्रीय महामार्ग रोखून धरणार असल्याची घोषणा स्वाभिमानी संघटनेचे नेते व माजी खासदार शेट्टी यांनी केली आहे.
मागच्या वर्षीच्या हंगामातील तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता 400 रुपये व चालू वर्षी उसाची पहिली उचल 3500 रुपये द्या या मागणीसाठी, काल सांगली, सातारा ,कोल्हापूर जिल्ह्याच्या राज्यातील संपूर्ण ऊस पट्ट्यामध्ये,स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.राज्यातील कारखानदारांनी ऊस उत्पादकांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत,उसाचे एक कांडे देखील कारखान्याला जाऊ देणार नसल्याचा इशारा व पैसे मागे घे घेतल्याशिवाय हटणार नसल्याचा इशारा,स्वाभिमानी संघटनेचे नेते,माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
मागच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे ऊसाला अत्यंत पोषक वातावरण असून,ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कोणत्याही परिस्थितीत नुकसान होणार नसून,साखर कारखानदारांचेच नुकसान होणार आहे.राज्यातील साखर कारखानदारांनी तोंडाला लावलेले कुलूप उघडे करावे आणि शेतकरी संघटनेबरोबर चर्चा करावी.राज्यातील साखर कारखानदार जर बोलण्यास पुढे आले तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू,मात्र कोणत्याही परिस्थितीत कारखानदारांचे संघटन तोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नसल्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी कोणत्याही परिस्थितीत मागच्या वर्षीच्या हंगामातील 400 रुपये घेतल्याशिवाय मागे हटणार नसून,21 नोव्हेंबर पर्यंत निर्णय झाला नाही तर,पुढच्या रविवारी 26 तारखेला राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.