जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
केंद्र सरकारने साठेबाजी रोखण्यासाठी गव्हाच्या पिठाची विक्री,प्रति किलो 27.50 रुपये दराने ही लिलावाद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे.केंद्र सरकारने खुल्या बाजारात केलेल्या लिलावात,2 लाख 85 हजार टन गहू व 5 हजार टनापेक्षा जास्त तांदळाची विक्री झाली आहे.केंद्र सरकारने आता देशातील गहू,गव्हाचे पीठ व तांदूळ यांच्या किंमती ग्राहकांना परवडण्याजोग्या राहाव्यात यासाठी,साप्ताहिक ई लिलाव आयोजित केले असून,केंद्रीय भांडार,नाफेड सारख्या निमशासकीय संस्थाना,सुमारे 2.50 लाख टन अतिरिक्त गव्हाचा साठा,ग्राहक व्यवहार मंत्रालयाने करून दिला आहे. त्यामुळे हा गहू दळून त्याचे पीठ प्रति 27.50 किलो दराने, भारत आटा संस्था या नावाने करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने सदरहू घेतलेला निर्णय हा,साठेबाजी रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून,या लिलावापासून घाऊक व्यापाऱ्यांना दूर ठेवण्यात आलेले आहे.केंद्र सरकारच्या यंत्रणेने नुकतेच,देशभरात सुमारे 1800 छापे टाकले असल्याचे सरकारी पत्रकार नमूद करण्यात आले असून,साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर अत्यंत कडक कारवाई करण्यात येणार आहे.केंद्र सरकारने देशातील नागरिकांच्यासाठी गव्हाच्या पिठाची विक्री रास्त दराने होऊन मिळण्यासाठी,फार मोठे पाऊल उचलले काय असून,याचा निश्चितच फायदा देशातील नागरिकांना सद्यस्थितीतील काळात मिळणार आहे.