जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचेकडे,उद्यापासून सलग 3 डिसेंबर पर्यंत,सुट्टीचे दिवस वगळून,शिवसेना आमदारांच्या अपात्रते प्रकरणी सुनावणी होणार आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील प्रभू यांची उलट तपासणी आज झाली असून,मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे वकील महेश जेठमलानी यांनी त्यांना आज काही प्रश्न विचारले आहेत.
दरम्यान इंग्रजी मध्ये होत असलेल्या नोंदीवर सुनावणी दरम्यान,काही वाद उपस्थित झाले होते.ज्येष्ठ विधीतज्ञ व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वकील महेश जेठमालांनी यांनी विचारलेले प्रश्न हे वेळ काढूपणाचे असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी केला आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलट तपासणी उद्याही सुरू राहणार आहे. उद्यापासून सुट्टीचे दिवस वगळता,शिवसेना आमदारांच्या अपात्रते प्रकरणी,3 डिसेंबर पर्यंत दररोज सुनावणी घेण्यात येणार असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतला असून,त्याप्रमाणे दररोज सुनावणी होणार आहे.