जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज,स्वदेशी बनावटीच्या लढाऊ विमान तेजस मधून सुमारे 45 मिनिटे गगन भरारी घेतली आहे.भारतीय कंपनी हिंदुस्तान ॲरोमॅटिक लिमिटेड या कंपनीच्या संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या तयार केलेल्या लढाऊ तेजस विमानांमधून,आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 45 मिनिटाचा प्रवास केला,शिवाय या विमानातून प्रवास करण्यासाठी शरीर व मन हे खूप सक्षम लागते.भारतीय स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान घेतलेला वेग आणि त्याने गाठलेली उंची लक्षात घेता,वैमानिकाची शारीरिक व मानसिक शक्ती अतिशय उत्तम लागते.भारतीय स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानांमधून हवाई प्रवास करणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिलेच ठरले असून,त्यांनी हवाई दलाचा गणवेश परिधान करून उड्डाण केले.स्वदेशी बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानामध्ये,स्वदेशी तंत्रज्ञान असून,दूरच्या क्षेत्रात शत्रूच्या विमानावर क्षेपणास्त्र टाकण्याची तसेच हवेतून हवेत इंधन भरण्याची व हवेतून जमिनीवरील लक्ष्याचा वेध घेणारी अत्याधुनिक सक्षम यंत्रणा,स्वदेशी बनावटीच्या लढाऊ तेजस विमानात बसवण्यात आलेली आहे.सध्य परिस्थितीत भारतीय बनावटीच्या स्वदेशी असलेल्या हलक्या लढाऊ तेजस विमानाच्या खरेदीसाठी,जागतिक स्तरावर स्पर्धा वाढत आहे. हिंदुस्तान ॲरोमॅटिक लिमिटेड कंपनी ही पूर्वी जवळपास बंद पडली होती,त्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्तेवर आलेल्या काळात उत्तेजन मिळून,भारतीय बनावटीच्या लष्करी साहित्याच्या उत्पादनास स्वदेशी तंत्रज्ञान निर्मितीत एक विकासाचा पाया घातला गेला आहे.
दरम्यान भारतीय बनावटीच्या लढाऊ तेजस विमानाच्या डिलिव्हरीची जवळपास 83 विमानांची ऑर्डर देण्यात असल्याचे वृत्त असून, त्यासाठी 36,468 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.सध्याची जागतिक स्थिती पाहता देशाच्या संरक्षण सज्जतेबाबत व स्वयंपूर्णतेबाबत,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार पाठपुरावा करीत असल्याचे दिसत असून, भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सन 2016 साली,भारतीय स्वदेशी बनावटीच्या हलक्या लढाऊ तेजस विमानाची पहिली आवृत्ती सामील झाली.एकंदरीतच भारताची संरक्षण सुसज्जतेत ही एक लक्षवेधी घोडदौड म्हणावी लागेल.