जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठीची असलेली पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा,दि.18 फेब्रुवारी 2024 रोजी होणार असून,परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
महाराष्ट्र राज्यात सद्यपरिस्थितीत 34 हजार 432 शाळा असून, जवळपास इयत्ता 5 वीच्या 3 लाख 77 हजार 806 विद्यार्थ्यांनी तर इयत्ता 8 वी च्या 2 लाख 82 हजार 457 विद्यार्थ्यांनी अर्ज केले असल्याचे समजत आहे.
परीक्षा परिषदेच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार,नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची अखेरची तारीख 30 नोव्हेंबर 2023 असून,विलंब शुल्कासह 15 डिसेंबर 2023 ही मुदत अंतिम आहे.एकंदरी यंदाच्या वर्षी पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणखी बऱ्याच प्रमाणात वाढणार असून,शिष्यवृत्ती परीक्षेत मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण होणार आहे.