जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यातील एस.टी. कर्मचारी व अधिकाऱ्याना 6000 रुपयांचा सानुग्रह बोनस जाहीर करण्यात आला असून,महाराष्ट्र राज्यातील एस.टी.कर्मचाऱ्यांना ही एक दिवाळीची गोड आनंदाची बातमी आहे.यंदाच्या वर्षीची दिवाळी ही एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांची अधिक गोड व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती,राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
सध्याच्या स्थितीत एस.टी.ची स्थिती ही झपाट्याने सुधारत असून, गेल्या काही वर्षापासून एसटी सेवा तोट्यात असल्याचे दिसत आहे. राज्यातील एस.टी.कर्मचाऱ्यांच्यासाठी शासनाने आता काही महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली असून,एसटी महामंडळास स्व मालकीच्या गाड्या खरेदीसाठी,यंदाच्या वर्षी 900 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.आज राज्याचे मंत्री महोदय उदय सामंत व एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संघटनेसोबत एक बैठक पार पडली असून,काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे.240 दिवसाची,खात्याअंतर्गत बढतीसाठी आवश्यक असलेल्या अटीस सुद्धा,स्थगिती देण्यात आली असून,सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्यासाठी 30 नोव्हेंबर 2023 पूर्वी,सेवाशक्ती संघर्ष एस.टी.कर्मचारी संघाशी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
आजच्या झालेल्या बैठकीत मंत्री महोदयांसोबत झालेल्या चर्चेत अनेक निर्णय घेण्यात आले असून,कॅशलेस मेडिक्लेम साठी तालुका व जिल्हा स्तरावर रुग्णालये निवडण्यात येणार असून,घरभाडे भत्ता,महागाई भत्ता,वेतन वाढीच्या दराची थकबाकी यासंबंधी 30 नोव्हेंबर पूर्वी निर्णय घेण्यात येणार आहे. एकंदरीतच महाराष्ट्र राज्यातील एस.टी.कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या 6000 रुपये सानुग्रह बोनसामुळे,एस.टी. कर्मचाऱ्यांच्यात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले असल्याचे चित्र दिसत आहे.