जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
वृत्त- सोशल मीडिया
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत प्रदूषणाची हवा, संवेदनशील अस्वस्थ करणारी असल्याचे दिसत आहे.केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ च्यानुसार,शनिवारी सकाळी राजधानीतील अनेक भागात हवेची गुणवत्ता निर्देशांक (ए क्यू आय)400 च्या पुढे नोंदवण्यात आला असून,हवामान तज्ञांच्या मते शेजारील राज्यातील व स्थानिक कारणामुळे हवामानातील प्रतिकूल स्थिती राहत असते.
भारतीय हवामान खात्याच्या अनुसार 27 नोव्हेंबर रोजी वातावरणातील बदलामुळे हलक्या मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून,त्यामुळे हवा प्रदूषणात काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.त्यामुळे तापमानात किंचित घट दर्शवत असून,30 नोव्हेंबर पर्यंत पहाटेच्या वेळी धुके राहण्याची शक्यता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आज दिल्लीतील पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे सकाळच्या तापमानात,नेहमीच्या तापमानापेक्षा 2 अंशाने घट झाली आहे. सध्यपरिस्थितीत उद्याच्या सोमवार पर्यंत तरी हवा प्रदूषणापासून,नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे.