जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
कोल्हापुरातील काळम्मावाडी धरणातील पाणी,ऐन दिवाळीत मी पालकमंत्री असताना मिळाल्याने,ही गोष्ट माझ्या भाग्याची असून,या पाण्याचे श्रेय कोणी एका व्यक्तीचे नसून,सर्व कोल्हापूरच्या जनतेचे असल्याचे मत राज्याचे मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे या गोष्टीत योगदान असून,त्यांचे खास आभार मानले पाहिजेत,कारण त्यांनी यासाठी तत्काळ पैसा उपलब्ध करून दिलेला होता.या योजनेसाठी लागणारा निधी,तत्काळ उपलब्ध करून देऊन, निधी अभावी कधीही काम बंद पडले नसल्याचे नमूद केले आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा लवकरच करण्यात येणार असल्याचे, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्री यांनी स्पष्ट केले असून,या योजनेच्या कामात कोणताही भ्रष्टाचार झाला नसून,तसं वाटले तर त्याची योग्य यंत्रणेमार्फत चौकशी करू असे आश्वासन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.