जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
देशातल्या शेअर बाजारामध्ये आज दोन्हीही निर्देशांकामध्ये तेजी झाली असून,शुभ मुहूर्ताच्या सौद्यामध्ये,एका चांगल्या वातावरणात शेअर मार्केटचा प्रवेश झाला आहे.आज लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर,सायंकाळी 6:15 वाजता मुहूर्ताचे सौदे सुरू होऊन,संध्याकाळी 7:15 वाजता सौदे बंद झाले. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात साधारणपणे 355 अंकांची वाढ होऊन,65 हजार 259 अंकावर निर्देशांक असताना शेअर बाजार बंद झाला.तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टीची शंभर अंकाने वाढ होऊन 19 हजार 526 अंगावर निफ्टी बाजार बंद झाला.
देशात आज शेअर बाजारामध्ये आलेल्या तेजीच्या वातावरणामुळे,शेअर मार्केटमध्ये आज दिवाळी झाली असल्याचे दिसून आले.दोन्हीही निर्देशांकामध्ये जोरदार भाव वाढल्यामुळे,तब्बल 2.30 लाख कोटींचा नफा,शेअर मार्केटमध्ये प्राप्त झाला.देशातील अनेक मोठे गुंतवणूकदारानी आज,शेअर मार्केटच्या ट्रेडिंग साठी उपस्थिती लावली होती. आजच्या लक्ष्मी पूजनाच्या शुभ मुहूर्तावर,दोन्हीही निर्देशांकामध्ये घसघशीत वाढ झाल्याने,जवळपास गुंतवणूकदारांची दिवाळी साजरी झाली आहे.मुंबई शहर बाजारामध्ये 1957 पासून ट्रेडिंगचा मुहूर्त पाळला जात असून, राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये 1992 पासून ट्रेडिंग चा मुहूर्त,शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांकडून साजरा केला जात आहे.