जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगलीत आज अनेक मान्यवरांनी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त,समाधीस्थळी येऊन अभिवादन करून,पुष्पहार अर्पण केले.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून चार वेळा पद भूषवलेल्या स्वर्गीय वसंतराव दादा पाटील यांचे,सहकार क्षेत्रातील,कृषी क्षेत्रातील,उद्योग क्षेत्रातील,शिक्षण क्षेत्रातील कार्य असामान्य होते.शिवाय या सर्वच क्षेत्रातील प्रत्येक माणसांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते.
माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावदादा पाटील यांचे कर्तुत्व काळाच्या पुढचे होते व त्यांच्या कार्याचा वारसा आमच्या सोबत असून,तो जपण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करत राहू असे काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी म्हटले आहे.आज माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव दादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त, सांगलीत असणाऱ्या समाधीस्थळी,अनेक मान्यवरांनी येऊन, अभिवादन करून,पुष्पहार अर्पण केले.