कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते,माजी खासदार राजू शेट्टी व आमच्या मधील चर्चा अंतिम टप्प्यात.-- आमदार सतेज पाटील.!

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते,माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी आमची झालेली चर्चा अंतिम टप्प्यात असून,स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्था स्थितीचा प्रश्न निर्माण होत आहे अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते,माजी खासदार राजू शेट्टी व शेतकऱ्यांच्याशी झालेली चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगून,यंदाच्या वर्षीचा उसाचा हंगाम सुरू होण्यास ऊस दराच्या आंदोलनामुळे उशीर होत आहे.त्यामुळे कारखान्याचे देखील नुकसान होत आहे. बऱ्याच ठिकाणी ऊसतोड मजुरांच्या टोळ्या या परत जाण्याच्या मार्गावर असून,जर ऊस टोळ्या परत गेल्या तर, साखर कारखानदारांचे 4 ते 5 कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईला बोलावून घेऊन,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी ऊस दरवाढीच्या प्रश्नावर चर्चा करावी,अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली.

 कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याबरोबर चर्चा केली असून,येत्या 2 दिवसात ऊस दराच्या प्रश्नाच्या आंदोलनावर काहीतरी मार्ग निघेल असे वाटते.त्याबरोबरच पोलीस बंदोबस्तात ऊसतोड केल्याचा आरोप चुकीचा असून, जबरदस्तीने ऊसतोड करण्याचा प्रयत्न उद्भवत नसल्याचे, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.एकंदरीत राज्यातील चाललेल्या ऊस दरवाढीच्या प्रश्नावर आंदोलनाने जोर पकडला असून,महाराष्ट्र सरकार याबाबतीत काय निर्णय घेते? हे बघणे महत्त्वाचे ठरेल.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top