जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
आज जुना बुधगाव रोड पंचशीलनगर रेल्वे गेटला होणाऱ्या वाहतुकीच्या गैरसोईबद्दल सांगलीच्या नुकत्याच नवनियुक्त झालेल्या अप्पर पोलीस अधीक्षक मा.ऋता खोकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.पाहणी दरम्यान रेल्वे गेटला होणाऱ्या वाहतुकीच्या गैरसोईबद्दल त्यांना स्थानिक परिस्थितीची माहिती घेतली मा.अप्पर पोलीस अधीक्षकांनी देखील पंचशीलनगर ते जुना बुधगाव रोड दरम्यान पायी चालत संपूर्ण रस्त्याची पाहणी करत वाहतुकीचा आढावा घेतला.यावेळी वाहतूक शाखेचे प्रमुख कुलकर्णी साहेब यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांना संपूर्ण माहिती दिली.
यावेळी जुना बुधगाव रस्त्यावरून चार चाकी वाहने पूर्णपणे बंद करण्यात यावी त्याशिवाय वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार नाही अशी मागणी नागरिकांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल व राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समिती शहरजिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे यांनी पोलीस अप्पर अधीक्षकांकडे केली.
रेल्वे प्रशासनाच्या अक्षम्य चुकीच्या नियोजनामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजावरा उडाला आहे.
वास्तविक सदर रेल्वे गेटवर रेल्वे प्रशासनाचे आर.पी.एफ.जवानांची रेल्वेने नियुक्ती करणे गरजेचे होते पण तसे रेल्वेकडून होताना दिसत नाही.याबद्दल रेल्वेच्या निष्काळजीबद्दल निषेध करावा तितका कमीच आहे.रेल्वे प्रशासनाने बघ्याची भूमिका घेत आपली पहिल्यापासूनच आपली जबाबदारी झटकलेली आहे असे महालिंग हेगडे म्हणाले.रेल्वे गेट दरम्यान नागरिकांच्यात रोज वाद होऊन मारामारी-भांडण- वाद होत आहेत,वाद ठरल्यासारखे एक-दोन अपघात होत आहेत याची जबादारी कोण घेणार..?
पोलीस प्रशासनाला देखिल ट्राफिक कंट्रोल करताना मर्यादा पडत आहेत.त्यामुळे रेल्वे प्रशासन,महापलिका आणि पोलीस प्रशासन तसेच स्थानिक नागरिक अशी संयुक्त मिटिंग घेऊन यावर तोडगा काढण्यात यावा अशी मागणी अप्पर पोलीस अधीक्षकांकडे त्यांनी केली.
नवनियुक्त पोलीस अधीक्षकांकडून स्थानिक नागरिकांच्या खूप अपॆक्षा आहेत रेल्वे गेट दरम्यान वाहतुकीचा प्रश्न मार्गी लगावा असेही ते म्हणाले.तसेच संपूर्ण सांगलीकरांना विनंती आहे जड वाहने तसेच मोठ्या चारचाकी गाड्या जुना बुधगाव रेल्वे गेटवरून आणू नये त्यामुळे इथली वाहतूक व्यवस्था कोलमडत आहे,असेही ते म्हणाले.
यावेळी वाहतूक शाखेचे प्रमुख कुलकर्णी साहेब,संजय नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी इन्चार्ज पोलीस निरीक्षक अविनाश पाटील,ए.पी.आय.मनोज लोंढे व पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.