जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेनिमित्त येणाऱ्या लाखो भक्त,भाविक, वारकऱ्यांना स्वच्छतेच्या दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती,सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.येत्या गुरुवारी 23 नोव्हेंबर 2023 रोजी श्री.विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा,राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचे नमूद करून,यंदाच्या कार्तिकी एकादशीस पंढरपूर येथे,किमान 8 ते 10 लाख भाविक वारकरी येतील असे गृहीत धरण्यात आले आहे.
यंदाच्या वर्षीची पंढरपुरातील कार्तिकी एकादशीची वारी,भक्त,भाविक वारकऱ्यांसाठी स्वच्छतेची वारी ठरावी याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून,जिल्हा प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे.यंदाच्या वर्षी पंढरपूर येथे कार्तिक एकादशी 8 ते 10 लाख भाविक वारकरी येथील ही शक्यता गृहीत धरून,जिल्हा प्रशासनाच्या वतीने योग्य त्या सोयी- सुविधा पुरवण्यावर व कायदा- सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने चोख बंदोबस्तावर भर देण्यात आला आहे.