जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
पश्चिम महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे,अजूनही कारखाने बंद असल्यामुळे,शेजारील असलेल्या कर्नाटक राज्यातील कारखानदांर याचा पूर्ण फायदा घेत असल्याचे वृत्त आहे.कर्नाटक राज्यातून येणारा ऊस सुद्धा हा पूर्णपणे थांबला असून,स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे,पश्चिम महाराष्ट्रातील कारखाने अजूनही बंद ठेवले आहेत.गेले 20 दिवस महाराष्ट्रातील कारखाने बंद असून, कर्नाटक राज्यातील कारखानदारांनी जादा ऊस दर देऊन पळवण्यास सुरुवात केली असल्याचे वृत्त आहे.या सर्व गोष्टींचा फटका कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कारखान्याच्या ऊस गळीत हंगामावर होणार आहे.
सध्याच्या परिस्थितीत यंदाच्या वर्षी ऊस गाळपही कमी होणार असल्याचे चित्र,सध्याच्या अवस्थेत तरी दिसत आहे.काही ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी,ऊस आंदोलन करून,वाहने जाळण्याचे प्रकार घडले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय उसाला कोयता लावून न देण्याची भूमिका,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी घेतली आहे.एकंदरीतच सध्याच्या परिस्थितीत कर्नाटक राज्यातील कारखानदारांनी,पश्चिम महाराष्ट्रातील ऊस आंदोलनाचा फायदा घेतला असल्याचे दिसत आहे.