अवधूत परंपरेतील दत्तावतारी, प्रेमावतारी,पूज्य श्री पंत बाळेकुंद्री महाराज यांच्या पुण्यतिथी दिनविशेषानिमित्त,अध्यात्मिक अमृतबोधात्मक दृष्टिक्षेप.!

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

                      श्रीपंतमहाराज बाळेकुंद्री

ही परंपरा अवधूत परंपरा म्हणून ओळखली जाते. श्रीदत्तात्रेयांची प्रेमभक्ती हे या परंपरेचे मुख्य सूत्र आहे.श्रीपंत महाराज हे फार मोठे दत्तभक्त होते.त्यांनी बालावधूत महाराजांकडून अवधूत पंथाची दिक्षा घेतली होती. श्रीपंतमहाराजांनी मराठी आणि कन्नड भाषेमध्ये विपुल लिखाण केले आहे.त्यांनी रचलेली दत्तात्रेयांची शेकडो पदे, भजने,आरत्या उपलब्ध आहेत.तसेच त्यांनी भक्तांना लिहिलेली पत्रे प्रसिद्ध आहेत.श्रीदत्तात्रेयांनी अवधूत रूपामध्ये श्रीरामावधूतांवर कृपा केली.श्रीरामावधूतांनी श्रीबालावधूतांवर कृपा केली.आणि श्रीबालावधूतांनी श्रीपंतमहाराजांवर कृपा केली अशी ही परंपरा आहे.या परंपरेबाबत ‘अनादिसिद्ध श्रृतीसंमत संप्रदाय’ असा उल्लेख श्रीपंतमहाराजांनी केला आहे. 

श्रीदत्तात्रेयावर आणि अवधूतांवर निरतिशय प्रेम हीच अवधूत परंपरेची साधना आहे.विषयवैराग्य,सहजानुभव,बंधुप्रेम, विधिनिषेध त्याग,नि:स्वार्थ कर्म,संचित,अहंकारनाश, समरसता,सद्गुरुप्रीती,अद्वैतभक्ती इ.अवधूतपंथाची मुख्य वैशिष्टय़े आहेत.अवधूतपंथामध्ये बंधने नाहीत.येथे मुक्तीलाही कमी लेखले आहे.मुक्तीपलीकडची प्रेमभक्ती अशी अवधूत परंपरेची धारणा आहे.अवधूत परंपरेतील पूज्य श्री पंत बाळेकुंद्री महाराज यांच्या सांप्रदायातील शिष्यगण,भक्त- भाविक,संपूर्ण महाराष्ट्र,कर्नाटक राज्याच्या भागात आहेत. आज दत्तावतारी पूज्य श्रीपंत बाळेकुंद्री महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त चालत आलेल्या अवधूत परंपरेतील हा एक अध्यात्मिक अमृतबोधात्मक दृष्टिक्षेप होय.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top