आरोग्य भाग- 11
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
बार्ली हे एक गवत कुटुंबातील धान्य असून,आयुर्वेदात बार्लीला यव म्हणतात.बार्ली हे एक प्राचीन अन्नधान्य आहे.बार्ली म्हणजेच यवा मध्ये,कश्य,मधुरा रस,रुक्षा,शिता वीर्यासह लघु गुण व आयुर्वेदिक फार्माकोडायनामिक्सनुसार कटू विपाक आहे.बार्ली हे विरघळणारे व न विरघळणारे फायबर,प्रथिने, विटामिन बी,व्हिटॅमिन सी,लोह,तांबे यांचा चांगला स्त्रोत असलेला आरोग्यासाठी हितकारक पदार्थ आहे.
बार्ली मुळे कोलेस्ट्रॉल कमी होऊन,हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.बार्लीमुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते.बार्ली वजन कमी करण्यास मदत करते.बार्ली हे हृदयरोगावर रक्तवाहिन्या संबंधात असलेल्या आजारावर,मात करण्यास चांगली मदत करते.बार्ली मुळे शरीरास आवश्यक असणारी जीवनसत्वे व खनिजे मिळून,आरोग्य सुधारण्यास मदत होते.बार्लीमुळे रक्तदाब नियंत्रणात राहून,नैसर्गिकरित्या शरीराचा रक्तदाब चालू राहतो.
बार्लीमुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होऊन,शिवाय रक्तातील साखर नियंत्रित होण्यासाठी फार मोठा उपयोग होतो.मधुमेही रुग्णांसाठी बार्ली चे पीठ तयार करून,त्यामध्ये मेथी,दालचिनी पावडर,गव्हाचा कोंडा वापरल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासाठी फार मोठा उपयोग होतो.अशा रीतीने मधुमेही रुग्णांसाठी व शारीरिक तंदुरुस्तीसाठी,बार्ली हे धान्य अतिशय उपयुक्त,हितकारक आणि मधुमेही रुग्णांसाठी एक उत्तम आहारासाठी पर्याय आहे.
सदरहू बार्लीचे लेखांकन,माहिती संकलित करून, जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क कडून जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे.