जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
भारतीय रिझर्व बँकेचे माझी गव्हर्नर एस.व्यंकटरमण यांचे आज वयाच्या 92 व्या वर्षी,दीर्घ आजाराने नवी दिल्लीत निधन झाले.ते भारतीय रिझर्व बँकेचे तत्कालीन 18 वे गव्हर्नर म्हणून पूर्वी कार्यरत होते.आज पर्यंत त्यांनी कर्नाटक राज्याच्या व केंद्र सरकारच्या अर्थ विभागात सचिव पदावर काम केले असून, देशातील अडचणीच्या कार्यकाळात जागतिकस्तरावर त्यांनी, अनेक आघाड्यांवर रिझर्व बँकेची धुरा यशस्वीपणे पेलली होती.आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या चलन स्थिरीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी व इतर आर्थिक सुधारणांचे कार्यक्रम त्यांच्या कार्यकाळात प्रशंसनीयपणे राबवले होते. रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या गव्हर्नर पदी असताना त्यांनी अनेक अडचणींचा आर्थिक स्तरावर,देशाची घडी बसवताना सामना केला होता.रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर एस व्यंकटरमण हे एक उत्तम प्रशासक होते.