आरोग्य विषयक घरगुती उपचारांबाबतीत अत्यंत उपयुक्त व आवश्यक असलेली माहिती.!

0

 आरोग्य भाग-7.

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

आजकालच्या युगात धावत्या जीवनशैलीमुळे छोटे-मोठे आजार होत असतात.परंतु,त्याकडे दुर्लक्ष करण्याकडे कल वाढत चालला आहे.हे जास्त धोकादायक ठरू शकते.काही आजार असे असतात ज्यांच्यावर वेळीच घरगुती उपचार केले तर ते बरे होऊ शकतात.स्वयंपाकघरात विविध औषधे उपलब्ध असतात.यासंदर्भात माहिती असल्यास अनेक आजारांना निश्चितपणे दूर ठेवता येते.प्राचीन काळापासून चालत आलेल्या काही घरगुती उपायांची माहिती आपण घेणार आहोत.

हे उपाय करा.....

१.) नेहमी तरुण राहण्यासाठी मध,आवळा ज्यूस,खडीसाखर सर्व सामग्री १० ग्रॅम घेऊन २० ग्रॅम तुपात मिसळून सेवन करा.

२.) लोण्यामध्ये थोडेसे केशर मिसळून दररोज हे मिश्रण ओठांवर लावल्यास काळे ओठसुद्धा गुलाबी होतील.

३.) तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी दालचिनीचा तुकडा तोंडात ठेवा.तोंडाची दुर्गंधी लगेच दूर होईल.

४.) लसणाच्या तेलात हिंग आणि ओवा टाकून हे मिश्रण शिजवून हाडांच्या जोडांवर लावल्यास आराम मिळले.

५.) लाल टोमॅटो आणि काकडीसोबत कारल्याचा ज्यूस घेतल्यास मधुमेह दूर होतो.

६.) ओवा बारीक करून याचा लेप लावल्यास सर्वप्रकारचे त्वचा विकार दूर होतात.

७.) कोरफड आणि आवळ्याचा रस एकत्र करून घेतल्यास रक्त शुद्ध होते, तसेच पोटाचे विविध आजार दूर होतात.

८.) 20 ग्रॅम आवळा आणि 01 ग्रॅम हळद एकत्रितपणे घेतल्यास सर्दी आणि कफमध्ये आराम मिळेल.

९.) मध,आवळ्याचा रस आणि बारीक खडीसाखर सर्व सामग्री दहा-दहा ग्रॅम तुपासोबत घेतल्यास तारुण्य नेहमी कायम राहते.

१०.) ओवा बारीक करून त्यामध्ये लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण चेहरावर लावल्यास पुरळ,मुरुमाचे फोड दूर होतात.

११.) युकेलिप्टसच्या तेलात रुमाल बुडवून वास घेतल्यास सर्दीमध्ये आराम मिळेल.

१२.)20 मिलीग्रॅम आवळ्याच्या रसात 05 ग्रॅम हळद मिसळून हे चाटण घेतल्यास नेत्र ज्योती वाढते.

१३.) सकाळी उठल्यानंतर तुळशीचे पानं खाल्य्यास तब्येत सुधारेल.

१४.) जर तुम्ही कफ आणि खोकल्यामुळे त्रस्त असाल तर ओव्याची वाफ घ्या.कफ बाहेर पडेल.

१५.)अद्रकाचा रस आणि मध समान प्रमाणत घेतल्यास सर्दी दूर होऊ शकते

१६.)थोडासा गुळ खाल्ल्याने विविध प्रकारचे रोग दूर होतात, परंतु गुळ जास्त प्रमाणात खाऊ नये.

१७.) दररोज जेवण केल्यानंतर ताक प्यायल्याने विविध आजार दूर होतात आणि चेहरा चमकतो.

१८.) ताकामध्ये हिंग,काळेमीठ,जीरा टाकून प्यायल्यास विविध प्रकारचे रोग दूर होतात.

१९.) कडूलिंबाचे सात पानं रिकाम्यापोटी चावून-चावून खाल्यास डायबिटीज दूर होतो. 

२०.) 20 ग्रॅम गजराच्या रसात ४० ग्रॅम आवळ्याचा रस मिसळून प्यायल्यास ब्लडप्रेशर आणि हृदयाचे आजार दूर होतात. 

२१.) डाळीच्या पिठात थोडासा लिंबाचा रस,मध आणि पाणी एकत्र करून हा लेप लावल्यास चेहरा आकर्षक आणि सुंदर दिसतो.

२२.) चवळी आणि पालकाची भाजी भरपूर प्रमाणात नियमित खाल्ल्याने तारुण्य कायम राहते.

२३.)मधाचे सेवन केल्याने गळ्याशी संबंधित सर्व समस्या पूर्णपणे नष्ट होऊन आवाज मधुर होतो.

२४.) सर्दी झाली असेल तर कोमट पाणी प्यावे.आराम मिळेल.

२५.) ताकामध्ये 05 ग्रॅम ओव्याचे चूर्ण मिसळून घेतल्यास पोटातील जंत नष्ट होतात.

२६.) सकाळ-संध्याकाळ जांभळाच्या बियांचा रस प्यायल्याने डायबिटीजमध्ये आराम मिळेल.

२७.) पित्त वाढल्यास कोरफड आणि आवळ्याचा रस एकत्र करून घ्या.

२८.) दालचिनी पावडर पाण्यासोबत घेतल्यास जुलाबाचा त्रास कमी होईल.

२९.) गुळामध्ये थोडासा ओवा मिसळून खाल्ल्यास अ‍ॅसिडिटीमध्ये आराम मिळेल.

सदरहू लेख डॉ.प्रमोद ढेरे निसर्गोपचार तज्ञ यांचा असून, आरोग्य आणि समर्थ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून संपादन करून,जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top