पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात १० पात्र लाभधारकांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप.!

0

 -‘आनंदाचा शिधा’ जिल्हयातील ५.७६ लक्ष पात्र कुटुंबांना मिळणार.

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अजित निंबाळकर)

 जिल्ह्यात सुमारे ५ लाख ७६ हजार ६४४ कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ वितरीत केला जाणार आहे.यामध्ये एक किलो साखर,एक लिटर खाद्यतेल तर प्रत्येकी अर्धा किलोची रवा,चणाडाळ,मैदा आणि पोह्याची पाकिटं असे एकूण सहा जिन्नस प्रति शिधापत्रिकास ई-पॉस प्रणालीद्वारे प्रति संच शंभर रुपये या दराने वितरीत करण्यात येणार आहेत.या अनुषंगाने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात १० पात्र लाभधारकांना जिल्हास्तरावर ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात आला.यावेळी खासदार धनंजय महाडिक,खासदार धैर्यशील माने,जिल्हाधिकारी राहूल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील,पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित,जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण उपस्थित होत्या.

राज्य सरकारकडून दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणारा आनंदाचा शिधा सर्व तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळेल याची दक्षता घ्यावी अशा सूचना पालकमंत्री यांनी पुरवठा विभागाला दिल्या.ते पुढे म्हणाले,आनंदाचा शिधा व इतर धान्य योजनांचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावा,यासाठी जे शिधापत्रिका धारक ऑनलाइन नाहीत त्यांना तत्काळ ऑनलाइन करून घ्यावे.दिवाळीत राज्यातल्या नागरिकांना १०० रुपयांमध्ये आनंदाचा शिधा दिला जात आहे.राज्यातील सर्व अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे.  

कोल्हापूर जिल्हयातील ‘आनंदाचा शिधा’ तालुकानिहाय पात्र लाभार्थी संख्या.

आजरा – २१८६४,भुदरगड – २५८२४,चंदगड – २९२९०, गडहिंग्लज- ३४०८०,गगनबावडा- ५८३१,हातकणंगले – ६६६५५, इचलकरंजी शहर- ३९०१८,कागल – ३९९९८, करवीर- ७१९७१,कोल्हापूर शहर- ७३६६८,पन्हाळा-४४३८९, राधानगरी-३४७९१,शाहूवाडी- २९९२३,शिरोळ – ५९३४२.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top