जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
दुबईमध्ये आजपासून सुरू होत असलेल्या एअर शोमध्ये, भारतीय वायुदलाचे पथक सहभागी होत असून,प्रत्यक्ष भारतीय वायुदल हवाई प्रात्यक्षिकें सादर करणार आहे.आज पासून सुरू होत असलेल्या दुबईच्या एअर शो मध्ये, आंतरराष्ट्रीयस्तरांवर वरील देशांची पथके सहभागी होणार असून,त्यात भारतीय वायुदलाचे पथकही सहभाग घेणार आहे.
काल दुबईतल्या अलमक्तुम विमानतळावर,भारतीय वायुदलाचे अत्याधुनिक हलक्या वजनाचे असलेले तेजस विमान,लढाऊ ध्रुव हेलिकॉप्टर सह वायुदलाचे पथक, सी- 17 ग्लोबमास्टर विमानातून दाखल झाले.भारतीय वायुदलातील तेजस विमानाचे हवाई प्रात्यक्षिकेही होणार असून,हे विमान प्रदर्शनात देखील ठेवण्यात येणार आहे.
भारतीय वायुदलाला लढाऊ हलक्या जातीच्या तेजस विमानाद्वारे व लढाऊ ध्रुव हेलिकॉप्टरद्वारे आपली वायुदलाच्या क्षेत्रातील ताकद,जगाला दाखवण्याची संधी मिळणार आहे. एकंदरीतच दुबईत होणाऱ्या एअर शोमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व देशांची वायुदलाची पथके समावेश होणार असल्याने,याला एक आगळे वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे.