जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यात अंमली पदार्थांच्या गैरव्यवहारात गुंतलेल्या लोकांविरुद्ध,कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन,राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.आज नागपुरातील वार्ताहर परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने सध्या अंमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र अभियान सुरू केल्या असून,महाराष्ट्र अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी,अभियानांतर्गत जोर देण्यात येईल असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राज्यात सध्या अंमली पदार्थांच्या गैरव्यवहारात काही लोक गुंतले असल्याचे निदर्शनास आले असून,त्या सर्व लोकांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.खरोखरच महाराष्ट्र अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त व्हावा अशी राज्यातील नागरिकांची फार इच्छा असून,राज्य सरकारने चालू केलेल्या अंमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी होण्याकडे राज्य सरकारने प्राधान्य दिले आहे.दरम्यान राज्यात अंमली पदार्थांच्या गैरव्यवहारात गुंतलेल्या पोलिसांना तत्काल बडतर्फ करण्यात येईल असेही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.