जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यात अजून 3 दिवस अवकाळी पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली असून, मराठवाडा,विदर्भ,कोकण,मध्य महाराष्ट्र आदी भागात, विजेच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे.गेले 4-5 दिवस राज्यात अवकाळी पावसाने कहर केला असून,राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे.काही ठिकाणी राज्यातील शेतकऱ्यांचे उभी पिके,गारपिटीमुळे जमीन दोस्त झाली आहेत व केळीच्या बागा,द्राक्षांची बागा यासह फळबागांचे फार मोठे नुकसान झाले आहे.
सध्यपरिस्थितीत महाराष्ट्र राज्यातील पीक नुकसानग्रस्त शेतकरी,शासनाच्या मदतीवर विसंबून बसला आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार,मध्य महाराष्ट्र, मराठवाडा,कोकण तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस हा जवळपास 3 दिवस होणार असल्याची शक्यता आहे.मात्र शनिवारपासून राज्यातील अवकाळी पावसाचा कहर कमी होण्यास सुरुवात होईल.
महाराष्ट्र राज्यात जिल्ह्यातील ठिकठिकाणी,पिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार,पीक नुकसानीचे पंचनामे सुरू असून,राज्य शासनाने पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत देणे अनिवार्य व फार अत्यंत गरजेचे आहे.