जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
पंढरपुरात आज विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली असून,राज्यातील जनतेला,शेतकऱ्यांना,कष्टकरी समाजाला,सुखी समाधानी ठेवून,त्यांची संकटे दूर करावीत अशी प्रार्थना श्री विठ्ठल रुक्मिणी देवतेच्या चरणी त्यांनी केली आहे.महाराष्ट्र राज्यातील सर्व समाजस्तरांतील घटकांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी,आम्हाला शक्ती आणि आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी देवाच्या चरणी केली.पंढरपूर येथे आज श्री विठ्ठल रुक्मिणी देवाची शासकीय पूजा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाल्यानंतर,वार्ताहरांशी ते बोलत होते.
दरम्यान पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या देवतेच्या पूजेचा पहिला मान म्हणून राज्यातील श्री.बबन विठोबा घुगे आणि सौ.वत्सला बबन घुगे यांना मिळाला.श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिसरातील देवतांच्या विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील भूमिपूजनाचा कार्यक्रमही,आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होऊन,जवळपास 26 कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन समारंभ आज पार पडला.पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवतेच्या विकास आराखड्यासाठी जवळ जवळ 73 कोटी रुपयांचा निधीची तरतूद केली असून,त्यातील पहिल्या टप्प्यातील 26 कोटी रुपयांच्या विकास कामांचा आज भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.पंढरपूर येथे आज झालेल्या कार्यक्रमास सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजी सावंत,कामगार मंत्री सुरेश खाडे,मान्यवर लोकप्रतिनिधी व मंदिर समितीचे सर्व वरिष्ठ अधिकारी वर्ग उपस्थित होता.