जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्य आज वसुबारसच्या पूर्वसंध्येला दीपावली सणाचा प्रारंभ झाला असून,राज्यात सर्वत्र उत्साहजनक वातावरण दिसत आहे.दीपावली सणानिमित्त राज्यातील नागरिकांच्यात अमाप उत्साह दिसत असून,सर्वत्र खरेदीसाठी नागरिकांची लगबग दिसत आहे.आकाश कंदील,पणत्या, दिव्यांच्या आकर्षक रोषणाईच्या माळा,रांगोळी आदी गोष्टींच्या स्टॉलनी,बाजारपेठा सजल्या असून,नागरिक ही मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडले आहेत.
आज महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी राजभावनातील कर्मचारी,कंत्राटी कामगार व इतर श्रमिक बांधवांना मिठाई वाटप करून,दीपावली सणानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.यंदाच्या वर्षीच्या दीपावलीचा प्रकाशोत्सव,सर्व लोकांच्या जीवनात आनंद,संपन्नता व सुख शांती घेऊन येवो, व हा सण साजरा करताना ध्वनी व वायू प्रदूषण टाळण्याचा नागरिकांनी प्रयत्न करावा अशा शुभेच्छा महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी दिल्या आहेत.
महाराष्ट्र राज्यात वसुबारसच्या पूर्वसंध्येला दीपावलीस सुरुवात झाली असून,सर्वत्र धनत्रयोदशी,नरक चतुर्दशी,पाडवा व भाऊबीज हे सण साजरे करण्यासाठी नागरिकांच्यात आनंदाचे- उत्साहाजनक वातावरण दिसून आले आहे.महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या बाजारपेठा विविध प्रकारच्या वस्तूंच्या स्टॉलनी सजल्या असून,बाजारपेठेत नागरिकांची लगबग सुरू आहे.
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्कच्या वतीने महाराष्ट्रातील असंख्य वाचकांना दीपावली सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.