जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
मुंबई येथील संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी हुतात्म्य पत्करलेल्या 107 हुतात्म्यांना,आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा स्मारक येथे जाऊन,पुष्पचक्र अर्पण करून, अभिवादन केले.राज्यातील प्रत्येक क्षेत्रात आघाडी मिळवून त्याचा नावलौकिक सदैव अबाधित ठेवणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.केवळ शहिदांना अभिवादन करून उपयोग नाही. मुंबई येथे झालेल्या आज हुतात्मा स्मारकावरील अभिवादन कार्यक्रमास विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवर महोदय उपस्थित होते.