जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश ठरलेल्या न्यायमूर्ती फातिमा बीबी यांचे,केरळ मधल्या कोल्लम येथे निधन झाले असून,त्या 96 वर्षाच्या होत्या.केरळमध्ये सन 1927 साली त्यांचा जन्म झाला असून,वडिलांच्या प्रेरणेमुळे त्यांनी कायद्याचा अभ्यास सुरू करून,1950 साली बार कौन्सिलच्या परीक्षेत अव्वल स्थान पटकावून सुवर्णपदक मिळवले.सन 1983 साली त्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून कार्यरत होत्या व सन 1989 साली त्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून नियुक्त झाल्या.सन 1993 मध्ये न्यायमूर्ती पदावरून निवृत्त झाल्यावर, राष्ट्रीय मानव अधिकार आयोग यांचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले असून,तामिळनाडूच्या राज्यपाल म्हणूनही त्यानी काही काळ काम केले आहे.सर्वोच्च न्यायालयात सन 1989 मध्ये त्यांनी न्यायमूर्ती म्हणून शपथ घेऊन,पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्याचा मान पटकावला.