जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही माझीपण प्रामाणिक भूमिका असून,मात्र इतर कोणालाही ओबीसीच्या आरक्षणाच्या कोट्यातून आरक्षणाचा वाटा दिला तर मात्र हा मुद्दा न्यायप्रविष्ट होईल असे मत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.नाशिक मधील इगतपुरी येथे विविध कामांचे लोकार्पण व भूमिपूजन समारंभ आज,राज्याचे अन्न आणि नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले,त्यावेळी ते बोलत होते.
राज्यातील ओबीसी समाजाने एकेकाळी आरक्षणासाठी दीर्घकाळ लढा दिला असून,ओबीसी आरक्षणाच्या कोट्यातून इतर कोणालाही आरक्षणाचा वाटा दिल्यास,हा मुद्दा न्यायालयात पुन्हा प्रलंबित राहील असे प्रतिपादन राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.सध्या आपल्यावर दोन जातीत वितुष्ट निर्माण करण्याचा आरोप होत असून,त्याबरोबरच माझ्या राजीनाम्याचीही मागणी होत असल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे ओबीसी समाजाच्या खातर आपल्याला कोणत्याही पदाची फिकीर नसल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.राज्यात लोकप्रतिनिधीना गाव बंदी करण्यात येऊ नये असे आवाहनही राज्याचे अन्न आणि नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.