जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना डेंगू तापाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याचे स्पष्ट झाले आहे.आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपला रिपोर्ट,ट्विटरद्वारे पोस्ट केला आहे.यापूर्वी दसऱ्याच्या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील डेंगूची लागण झाली होती.त्यावेळी त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता.दरम्यान कालपासून मला ताप आलेला असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मी डेंगूची तपासणी करून घेतली असता,त्या तपासणीमध्ये रिपोर्ट द्वारे डेंगू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आता थोडे दिवस विश्रांती घेऊन,मी शक्य तितक्या लवकर माझ्या रोजच्या कामकाजास व पक्षाच्या कामकाजास सुरुवात करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.