सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज.!

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

सांगली जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक तसेच 22 ग्रामपंचायतीमधील 27 रिक्त जागांकरीता आणि 3 थेट सरपंच पोट निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार रविवार दि.5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होत आहे तर सोमवार दि.6 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान व मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली.

 या निवडणुकीच्या मतदानासाठी एकूण 365 मतदान केंद्रे असून राखीवसह 1 हजार 83 B.U. उपलब्ध करून दिलेले आहेत तर राखीवसह 541 C.U.उपलब्ध करून दिलेले आहेत. तसेच केंद्राध्यक्ष,मतदान अधिकारी 1,मतदान अधिकारी 2, मतदान अधिकारी 3 प्रत्येकी 127 मतदान अधिकारी-4, शिपाई 459 अशा एकूण 2 हजार 434  मनुष्यबळाची नेमणूक करण्यात आली आहे.निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण 1 लाख 87 हजार 798 मतदार असून यामध्ये पुरूष मतदार 96 हजार 867,स्त्री मतदार 90 हजार 930 व इतर 1 मतदारांचा समावेश आहे. 

 मतदान केंद्रावरील नियुक्त अधिकारी / कर्मचारी यांना तसेच मतदान केंद्रावरील साहित्य ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.त्यासाठी 56 बसेस व 55 जीप वापरल्या जाणार आहेत.निवडणूका असलेल्या गावामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मिरज तालुक्यातील जानराववाडी,अपर सांगली मधील हरिपूर व नांद्रे, कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव,कोकळे,ढालगाव, दुधेभावी,ढोलेवाडी व देशिंग,पलूस तालुक्यातील कुंडल व आमणापूर ही संवेदनशील गावे आहेत.मतदानाच्या आदल्या दिवशी,मतदानादिवशी व मतमोजणी दिवशी मद्यपान आस्थापना बंद राहतील.तासगाव तालुक्यातील  चिखलगोठण,कवठेमहांकाळ तालुक्यातील करोली टी, मळणगाव,ढालगाव,कडेगाव,तालुक्यातील मौजे चिंचणी, शाळगाव,पलूस तालुक्यातील कुंडल अशा एकूण 7 गावामध्ये  मतदानादिवशी बाजार दिवस असल्याने या गावामध्ये बाजार बंद राहील.

 मतदान केंद्राच्या परिसरामध्ये फौजदारी दंड संहिता कलम 144 लागू करण्यात आलेले आहे.त्याचा भंग होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी.मतदारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे व मतदानाची टक्केवारी वाढवावी.मतदानास येताना मतदारांनी विहीत केलेल्या 17 ओळखपत्रापैकी ओळखीचे पुरावे म्हणून आणावेत.

 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र भरल्यापासून मतमोजणी पर्यंतच्या कालावधीतील निवडणुकीवरील खर्च आयोगाने मर्यादा घालून दिलेल्या मर्यादेनुसार करण्याचा आहे.दैनंदिन झालेला खर्च हा उमेदवारांनी True Voter App यामध्ये भरण्याचाआहे. उमेदवारांनी केलेला खर्च पडताळणीसाठी तालुकास्तरावर पथक नेमण्यात आले असून त्याचे सनिंयंत्रण जिल्हा कोषागार अधिकारी यांच्याकडे देण्यात आलेले आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विहीत मुदतीत खर्च सादर न करणाऱ्या उमेदवाराविरूध्द निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कारवाई करण्यात येईल.निवडणूक प्रचार दि.3 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजता बंद झाला आहे.

 मतमोजणी दि.6 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता होणार असून तालुकानिहाय मतमोजणीचे ठिकाण पुढीलप्रमाणे.  मिरज - शासकीय धान्य गोदाम,वैरण बाजार मिरज, 

तासगाव - बहुउद्देशीय हॉल,तहसिल कार्यालय तासगाव,

 कवठेमहांकाळ - नवीन प्रशासकीय इमारत, 

जत / अपर संख - नवीन प्रशासकीय इमारत शेजारील तहसिल कार्यालय सभागृह, 

खानापूर- ‍विटा - मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तिसरा मजला मिटींग हॉल, 

आटपाडी - मध्यवर्ती प्रशासकीय इमारत भवन पहिला मजला मिटींग हॉल,कडेगाव - तहसिल कार्यालय कडेगाव पहिल्या मजल्यावरील हॉल,

पलूस - ‍मिटिंग हॉल तहसिल कार्यालय पलूस,

वाळवा-इस्लामपूर - नूतन इमारत तहसिल कार्यालय वाळवा-इस्लामपूर तळमजला,  

शिराळा - तहसिल कार्यालय शिराळा नवीन प्रशासकीय इमारत, 

अपर सांगली - अपर तहसिल कार्यालय सांगली, 

अपर आष्टा - अपर आष्टा तहसिल कार्यालय परिसरातील पशुवैद्यकीय गोदाम.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top