जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
मराठा समाजाच्या व धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणी निकालात काढण्यासाठी व घटना दुरुस्तीसाठी,संसदेचे विशेष सत्र अधिवेशन बोलवण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदारांनी,देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचेकडे केली आहे.आज नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदारांच्या शिष्टमंडळानी भेट घेऊन,वरील मागणी केली.
महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय व वंचित समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता,मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो.भारतीय राज्यघटनेनुसार कोणत्याही राज्याला 50 टक्के पेक्षा जास्त आरक्षण देण्याची परवानगी नसून,तो अधिकार राज्य सरकारला येत नसल्यामुळे,केवळ देशाच्या संसदेला अधिकार आहे.त्यामुळे मराठा समाजाच्या व धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा प्रश्न निकालात काढण्यासाठी व घटना दुरुस्ती करण्यासाठी,तात्काळ संसदेचे विशेष सत्र अधिवेशन बोलवावे,अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदाराने राष्ट्रपती महोदयांकडे केली आहे.