जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
श्री दत्तप्रभूंचे क्षेत्र गाणगापूर येथील प्रसिद्ध असलेल्या, भस्माच्या डोंगराविषयी,प्राचीन दिव्य माहिती आज देत आहोत.संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या,श्रीदत्त क्षेत्रातील गाणगापूर येथील,प्राचीन असलेल्या भस्माच्या डोंगराविषयी आध्यात्मिक दिव्य घेतलेला मागोवा,हा दत्त भक्तांना भक्तीविषयी प्रेरित करेल हे त्रिवार सत्य आहे.
भस्माचा डोंगर या दिव्य स्थळाचा एक विशेष महत्व आहे.
सदरील भूमीमध्ये अनेक ऋशी मुनींनी केलेली तप साधना यामुळे या तपोभूमितील “विभूती” अनेक भाविक घरी घेऊन जातात,त्याच प्रमाणे आपली मनोकामना पूर्ण होण्यासठी येथील पाषाणा द्वारे रचना तयार करायची एक पद्धत येथे प्रचलीत आहे.
श्रीक्षेत्र गाणागापूरचे भस्म प्रसिद्ध आहे.
हे भस्म हाच तिथला मुख्य गुरुप्रसाद असतो.हजारो वर्षांपासून ही भूमी पवित्र असल्यामुळे त्या काळात या ठिकाणी भगवान परशुरामांनी मोठमोठाले यज्ञ जगाच्या कल्याणासाठी केले होते.त्याच यज्ञातील विभूती साचून तिथे भस्माची एक प्रचंड टेकडीच निर्माण झालेली आहे.आजपर्यंत लक्षावधी श्रीदत्तभक्तांनी या भस्म टेकडीतून पवित्र भस्म नेऊनही ही भस्माची टेकडी आहे तशीच आहे.
श्रीक्षेत्र गाणगापूरच्या भस्माने पिशाच्च बाधा हटते.दृष्टिबाधा नाहीशी होते.रोगराई नाहीशी होती.हे भस्म संकटनाशक, दुरितहारक आहे.परमार्थिक साधकाच्या कल्याणासाठी या भस्माचा उपयोग करतात.संन्यासीवृंद भस्म स्नानासाठी याच भस्माचा उपयोग करतात.अध्यात्मिक साधनेसाठी सर्व दत्तभक्त,संन्याशी,योगी या भस्माचा वापर कायाशुद्धीसाठी व साधनेसाठी करतात.