जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्या असून,आज त्यांनी पुण्यातील खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 145 व्या तुकडीच्या दीक्षांत संचालनाची मानवंदना स्वीकारली आहे.राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी च्या माध्यमातून मिळालेले मूलभूत शिक्षण,स्नांतकांना आयुष्यभर उपयोगी पडेल असे देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या दीक्षांत समारंभात म्हटले असून,राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या संचालनात सहभागी झालेल्या महिला स्नातकांचे कौतुक केले आहे.
आज पुण्यात झालेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक टपाल तिकिटाचे व नाण्याचे प्रकाशनही देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले असून, राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथे जाऊन शनी मंदिरात,षोडशोपचारिक पूजा व अभिषेक त्यांनी केला आहे.उद्या नागपूर मध्ये राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे व रुग्णालयाच्या अमृत महोत्सवाचे उद्घाटन होईल.
शनिवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या 111 व्या दीक्षांत समारंभाला, देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उपस्थित राहणार आहेत.उद्या पुण्यातल्या सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय मानाचा ध्वज प्रदान करण्याचा समारंभ,देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होईल.