जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
विठ्ठल उमप फाउंडेशन च्या वतीने देण्यात येणारा मृदगंध जीवनगौरव पुरस्कार,ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना, यंदाच्या वर्षी जाहीर झाला आहे.आज पुणे येथे पत्रकार परिषदेत,विठ्ठल उमप फाउंडेशनचे अध्यक्ष नंदेश उमप यांनी, या पुरस्काराच्या नावासंबंधी घोषणा केली आहे.
विठ्ठल उमप फाउंडेशन च्या वतीने यंदाच्या 13 व्या वर्षी लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारंभ होणार असून, त्याचबरोबर विठ्ठल उमा फाउंडेशनच्या मृदगंध जीवनगौरव पुरस्काराचे वितरणही दि.26 नोव्हेंबर 2023 रोजी,ठाण्यातील काशिनाथ घाणेकर सभागृहात सायंकाळी होणार आहे. यंदाच्या वर्षीचा विठ्ठल उमप फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा मृदगंध जीवन गौरव पुरस्कार,ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जाहीर झाल्यामुळे,नाट्यप्रेमी रसिकांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.